
ओळखीनंतर अनोळखी...
Read Count : 205
Category : Poems
Sub Category : N/A
कस आहे ना की...हळूच अलगद कोणी तरी आयुष्यात आल कीभर उन्हात पावसाने चातकाची तहान भागवावीअसं काहीसं होऊन जातं...अनोळखी ; पण ओळखीच होऊन जात..एकाकी आयुष्यात जणू सोबतीची चाहूल देत...बेरंग आयुष्यात जणू इंद्रधनु चे रंग चढवत..कस आहे ना की ,आपण अपेक्षांचं ओझ दुसऱ्यावर लादतोत..अधिकार नसताना हक्क गाजवतोत..कुठून येतं हे उसन बळ कोण जाणे ?.पण समोरची व्यक्ती आपलीच आहे असंबेधडकपणे मिरवतोत..कस आहे ना की,एकमेकांचा केलेला विचार हा एकमेकांना दिसतोचअसं नाही..व्यक्त होण हे विचारांच्या बरच पलीकडे असतं...म्हणूनच की काय,निर्णयाला भागीदार भेटला की निर्णय चुकण्याचीभिती उरत नाही..बाकी तुझ तू ठरव..माझा भागीदार बनायचंकी,ओळखीनंतर अनोळखी.
Comments
- No Comments