
Poem
Read Count : 153
Category : Poems
Sub Category : N/A
माझं सोनुलं सोनुलं
माझं छकुलं छकुलं
बाळा स्वप्नात तुला
दोन्ही डोळ्यांनी जपलंपाळण्यात निजला काळजाचा तुकडा
खुदुखुदू हसला चंद्रावाणी मुखडा
हसू गालावरचं मी कसं ओठांनी टिपलंदुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा
घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलंउद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी
दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी
भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं
Comments
- No Comments