
Writing 066
Read Count : 151
Category : Poems
Sub Category : N/A
कोरोणा ची वैश्वविक बिमारी...कुठून आली हि कोरोणा ची बिमारी,बेजार झाली दुनिया सारी,इकडे तिकडे सगळे आहे कोरोना,मन आता कुठे ठाव देईना,माणसे अगोदर एकमेकांना भेटत होती,एक दुसऱ्यांंशी सुख दुःख वाटत होती,आता आली आहे खुप वाईट वेळ,कशाच कशाशी बसेना मेळ,माणसे दुरावण्याचा वाईट काळ,स्मशानात तेवतो सरणाचा जाळ,हॉस्पिटल मध्ये जागा नाही,श्वास घ्यायला ऑक्सिजन नाही,कोणाला येईन वास,तर कुणाला घेता येणार श्वास,मनातल्या मनात घुसमट सारी,कोरोना पोचला दारोदारी,आपलीच आपल्यापासून जात आहे दूर,सगळीकडुन येतो रडण्याचा सूर,आपणास घ्या काळजी आपली,येथे सर्व धरणीच कोपली,प्रत्येकाच्या मनात जगण्याची भ्रांती,घरीच राहा सुरक्षित घ्या विश्रांती,जगायचं असेल नंतर,एक मेकात ठेवा अंतर,सतत धुवत राहा हात,नाही तर कोरोणा करेल घात,वेळीच घ्या औषध उपचार,नाही तर कोरोना करेल जीवावर वार.सौ.कामिनी भाकरे.
Comments
- No Comments