Writing 059 Read Count : 137

Category : Poems

Sub Category : N/A
मी पाहिले दिव्यास रडताना

रडताना या दिव्यास आज
मी पाहिले देवा,
पाहून महापुरुषांच्या जयंतीत
दडलेला जातीय ठेवा ||

आज त्यांचा उत्सव
विशिष्ट समाजच करत होता,
एकजण तर त्यांच्या कार्याला
बाटलीतच भरत होता ||

वाटले मला वाईट जेव्हा
मी भीमा,जोतीची मिरवणूक पाहिली,
संविधान लिहिणाऱ्या,तिला ओळख देणाऱ्यांना
आज रंगीत झेंड्यानेच फुले वाहिली ||

जात संपविणाऱ्यांनाच आम्ही
आज जातीत बांधले होते,
स्मारकही त्यांचे आम्ही
जातीच्या विटांनीच सांधले होते ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (११/०४/२०२१)
पुणे

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?