Writing 058
Read Count : 145
Category : Poems
Sub Category : N/A
माझे बालपण अंधारात जातेआगीचे हे लोढ उडतीपसरती मतभेदांच्या ज्वाळा,देण्यास मुठभर आनंद मलाउघड्याही नाहीत शाळा ||हसू,बोलू मी कुणा अन्जीवनाचा आनंद शोधू कसा,जिथे रोज उडती खटकेआहे भांडणाचा वसा ||दिवस जातो कामांत गुंतलेलारात्रही उद्याच्याच विचारात जाते,ते उद्या शोधतात पणमाझे बालपण अंधारात जाते ||बोलतो मी या बाहुल्यांनापण तेही व्यस्त आई-वडील होतात,ऐकतात माझे शब्द पणबोलताना परके होऊन जातात ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर(१०/०४/२०२१) पुणे
Comments
- No Comments