Writing 057 Read Count : 14

Category : Poems

Sub Category : N/A
द्यायचीच होती तुला तर....

द्यायचीच होतीच तुला तर
दिव्याची ज्योत द्यायची होती,
फुकट नाही व्याजासकट तिचीच
मशाल न्यायची होती ||

न्यायचेच होते तुला तर 
थोडा अंधार न्यायचा होता,
परत येताना वेशीवरून त्या
उजेड आणायचा होता ||

त्यायचीच होती भेट तुला तर
एक कागद द्यायचा होता,
पुन्हा पुढच्यावर्षी त्याचा तुच
ग्रंथ न्यायचा होता ||

उडवायचाच होता रंग तुला तर
शाईचाच उडवायचा होता,
त्या शाईने लिहिलेला शब्द
हृदयास भिडवायचा होता ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०९/०४/२०२१)
पुणे
Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?