सांग ना ग आई Read Count : 122

Category : Poems

Sub Category : N/A
सांग ना ग आई

वाट शोधतो मी आज आई
जगी राहणाऱ्या माणसाची,
पाहतो मी वाट रोज
माझ्या स्वप्नातील उजेडाची ||

राहते हे जग माझ्या गरीब
हातांनी बांधलेल्या घरात,
तरीही का असावी हाती माझ्या
रोज मोकळी परात ||

ओततो रोज मातीत मी
आई माझा घाम,
जगास देऊनही दाणापाणी रूसला का
माझ्यावरी हा राम ||

रोज देणाऱ्या हाती रंगीत झेंडे
या जगी मिळतो मान,
पण लावून मी माणुसकीच झाड
मोकळं का माझं रान ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०९/०४/२०२१)
पुणे


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?