
Writing 056
Read Count : 146
Category : Poems
Sub Category : N/A
अहंकाराचं पान फाटून गेलंयप्रसिद्धीच्या धुंदीत मीआज मन दुखावले एकाचे,पहिले पाऊल टाकण्याआधीचस्वप्न पाहिले शिखराचे ||चार दिवस काय लिहू लागलोगर्वाने फुगून गेलो ,पण मी फुगा नाही एकमाणूस आहे हेच विसरून गेलो ||स्वतःचीच लाज वाटतेय आजमी का चुकलो असं वाटतंय,विचार केला की आज माझंआभाळ फाटू लागतंय ||माझ्या शब्दांनीच आज मलाकोर्टात दोषी म्हणून उभं केलंय,लेखणी आहेच हातात पणअहंकाराचं पान फाटून गेलंय ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०८/०४/२०२१)पुणे
Comments
- No Comments