मुखवटे हे खोटे Read Count : 18

Category : Poems

Sub Category : N/A
मुखवटे हे खोटे

मुखवटे हे खोटे नुसते
इथे फक्त झगमगता प्रकाश असतो,
कधी एका क्षणी हसणाऱ्या चेहऱ्यांत
रडणारा चेहरा दिसतो ||

इथे रंगून चेहरे काही
सौंदर्याची व्याख्या बदलतात,
त्यामुळे खऱ्या जीवनाच्या नाटकात
रंगामुळे विवाह मोडताना दिसतात ||

इथे लिहिणारा व्यक्ती असतो एक
त्यांचे शब्द दहाजण वाचतात,
झगमगणारे चेहरे चिरकाल राहतात
पण लिहिणारे हात अंधारात जातात ||

इथे काचेत दिसणारे चेहरे
कधी मनाला रडवत असतात,
तर तेच काचेच्या बाहेर स्वतःचाच
चेहरा गर्दीत शोधताना दिसतात ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०७/०४/२०२१)
पुणे


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?