हेच जीवन माझे Read Count : 16

Category : Poems

Sub Category : N/A
हेच जीवन माझे

असेच माझे जीवन आहे
या फेसाळणाऱ्या लाटांचे,
वाटून घेतलेल्या प्रत्येक 
मोत्यावानी अनमोल घासांचे ||

इथे आहे अथांग सागर
कुटूंबाच्या गोड शब्दांचा,
संकटात कायम तयार असतो
आधार हजारो जहाजांचा ||

जीवनात या माझ्या असतो
निरागसपणा लहानांचा,
रेतीच्या कणाकणाप्रमाणे असतो
इथे सहवास विचारांचा ||

इथे प्रकाश असतो भोवती
तिच्या कोमल साथीचा,
नि सोबत जोडीला असतो
आशिर्वाद या मातीचा ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०४/०४/२०२१)
पुणे

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?