चमकावे हे जीवन माझे Read Count : 16

Category : Poems

Sub Category : N/A
चमकावे हे जीवन माझे

चमकावे हे जीवन माझे
या झगमगत्या जगावानी,
झुलत राहावे मी आनंदाने
या झुलणाऱ्या झोक्यावानी ||

स्वकर्तृत्वावावर गाठावे मी
क्षितिज त्या प्रकाशावानी,
चमकत राहावे मी सदा
या तेजस्वी चांदण्यांवानी ||

जावे डोंगरावर मी या
स्वातंत्र्याच्या पावलांनी,
क्षणोक्षणी चालत जावे मी 
गात आनंदाने गाणी ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०४/०४/२०२१)
पुणे


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?