
संसार
Read Count : 163
Category : Poems
Sub Category : N/A
संसारआज जीवन माझेभातुकलीचा खेळ झाले,खोट्या या संसारात मीवास्तवात न्हाऊन आले ||मला जीवन जगायचं होतंमाझं अगदी मनसोक्त,पण आज अडकून पडले मीआज या चुलीच्या धुरात फक्त ||माझ्या पुस्तकातील स्वप्नांचाआज पुरताच चुराडा झाला,आता फक्त रोज आयुष्यातउन्हाशीच संसार झाला ||नको होते मला हे जीवनीनुसते आसवांचे बंधन,पण न मागता मला मिळालेहे रोज अपशब्दांचे आंदण ||लक्ष्मी होण्याचे स्वप्न पाहत मीफक्त एक वस्तू झाले,एक दिवस नवरी होण्याच्या नादातमी स्वतःचेच अस्तित्व गमावले ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०४/०४/२०२१)पुणे
Comments
- No Comments