आज अचानक Read Count : 18

Category : Poems

Sub Category : N/A
|| आज अचानक ||

आज अचानक आमची मशाल
आसवांत का भिजली होती ?
दख्खनच्या त्या दगडावर धगधगणारी
ज्योत का विझली होती ?
अरे, विचारता काय आज
आमचा राजा गेला होता,
जाता जाता स्वराज्याचा सूर्य
हातावर ठेऊन गेला होता ||
आजच्याचदिवशी सह्याद्रीचा प्रत्येक 
डोंगर ढसढसा रडला होता,
कणखर त्या टकमक टोकाने
हंबरडा फोडला होता ||
आज स्वराज्याचा सारथीच पुढच्या
प्रवासाला निघाला होता,
आता तुझ्याविना या स्वराज्याचा
ध्वज पुन्हा अटकेपार न्यायचा होता ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०३/०४/२०२१)
आज ३ एप्रिल 
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज योगिराज श्रीमंत योगी नितीवंत बुद्धिवंत यशवंत जाणता राजा 
श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र 
अभिवादन 🙏🙏


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?