
माणसात देव शोधा ना
Read Count : 139
Category : Poems
Sub Category : N/A
|| माणसात देव शोधा ना ||जग वेडे का असते इतकेदगडाला रोज पुजते ना,इथे अन्नावाचून खऱ्या देवाचीकाया रोज झिजते ना ||श्रद्धा हवीच मनात पणमाणसात देव शोधा ना,शोधण्यास माणुसकी आजतुम्ही हृदयाला खोदा ना ||जरी गुंतले मन भक्तीत यातुम्ही शिक्षणाचे अभंग गा ना,बुडत्या एका जीवालातुम्ही मदतीचा हात द्या ना ||नारळ, फुले हवेत कशालातुम्ही निसर्ग देवतेला पुजा ना,मेघराजाच्या या प्रेमळ,उदारस्वभावात तुम्ही भिजा ना ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०२/०४/२०२१)वेळ ०९:१७
Comments
- No Comments