आईची माया Read Count : 12

Category : Poems

Sub Category : N/A
आईची माया

मरूनही आज ती
त्यांच्यासाठीच जगत होती,
स्वतः शिजूनही शिजलेला भात
पिल्लांना खाऊ घालत होती ||

संपूनही अस्तित्व त्या आईचे
ती पिल्लांची काळजी करत होती,
एकाचवेळी ताटाच्या मालकाची अन्
पिल्लांची भूक भागवत होती ||

श्वास कधीच निघून गेला होता
पण माया आजही ओढत होती,
जाऊ नको सोडून म्हणत चिमुकली
मोठमोठ्याने ओरडत होती ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२९/०४/२०२१)
पुणे

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?