एकांतात बसलो ना मी Read Count : 14

Category : Poems

Sub Category : N/A
एकांतात बसलो ना मी

एकांतात बसलो ना मी
थोडा स्वतःचा विचार करतो,
आठवून थोडे जुने दिवस
भविष्याची वाट धरतो ||

एक दिवस थोडा मी
स्वतःसाठी राखून ठेवतो,
गडबडीच्या जीवनातून एकदा
मळ्यात जाऊन मनसोक्त जेवतो ||

क्षणभर काठावर बसून तळ्याच्या
पाण्याच्या लाटा न्याहाळत बसतो,
जवळच्या टेकडीवर पळत जातो
जिथे वारा मला आवाज देत असतो ||

त्या फुलांवर फेऱ्या मारणाऱ्या
भुंग्याशी दोन शब्द बोलतो,
माझे जीवनगाणे ‌थोडे
त्या मित्रासमोर खोलतो ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२८/०४/२०२१)
पुणे
Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?