तू Read Count : 16

Category : Poems

Sub Category : N/A
तू माझा प्रत्येक विचार असतो

जरी नसतोस तू दिवसभर घरी
तरीही बाबा तुझी क्षणोक्षणी आठवण येते,
मी कसला रे नावाडी तुझी प्रेमळ हाकनेच
सागरा माझी जीवनाची होडी व्हलवत जाते ||

लोकांना वाटतं मी केलं पण खरा
पडद्यामागील कलाकार तू असतो,
जीवनगाण्याचा सूरच बदलतो जेव्हा
कामामुळे बाबा तू नजरेसमोर नसतो ||

तूच मला आधार देणारा ओंडका होतो
जेव्हा असते मनात वादळी दुःख,
जीवनात तुझीच सोबत असते बाबा
 मग असो दुःख वा सुख ||

मी झालो लेखणी तर बाबा
तू माझा प्रत्येक विचार असतो,
तू दिला नसता ना क्षणोक्षणी आशामय कंदील
तर आज मी मेणबत्ती झालोच नसतो ||

आदेश बाळू कोळेकर (विरोध काव्य निर्माता)
ही कविता जगातील प्रत्येक विचारास
समर्पित करतो


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?