
वेडे
Read Count : 133
Category : Poems
Sub Category : N/A
वेडेकिती भेटले मला वेडेघडणारे नि घडविणारे,स्वतःसोबत इतरांच्याहीस्वप्नांना आकार देणारे ||असे वेडे किती आसमंतात याकष्ट नि चिकाटीने भरारी घेणारे,रोज दिसतात मला चालतानागरूड आकाशी झेपावणारे ||कोणी मारतो रे सुरस्वप्नांच्या खोल डोही,कोणी एक लहान मुंगीस्वप्न वेचण्यात मग्न राही ||त्यांना या जीवनात भेटतीलफुले किती नि काटे किती,प्रामाणिकपणे झुलताना झोकात्यांना नाहीच पडण्याची भिती ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर(२५/०४/२०२१)पुणे
Comments
- No Comments