Writing 109 Read Count : 157

Category : Poems

Sub Category : N/A
हरवले बोलके घर

जशा घराच्या भिंती वाढल्या
तशी नातीही दुरावली गेली,
संपला निखळ आनंद आणि
स्मितहास्याची दुनिया आली 

एकत्रित दुरदर्शनचा आनंद घेणारी
भावंडे आता कुठेतरी हरवली,
संपले ताई दादांचे प्रेमळ भांडण
नि अनोखी काचेची दुनिया सापडली ||

वर्तमानपत्र वाचणारे आजोबा दिसतील कसे
त्यांना तर मुलाने वृद्धाश्रमात जागा दिली,
बऱ्याचशा घरांत तर पुस्तकांची जागा
हातभर आयताकृती काचांनी घेतली ||

आनंदाने गप्पा मारत काम करणारी
आई आज झालीय अव्यक्त,
शांत असणारे घर फक्त आज
क्रिकेटच्या विजयानंतरच होते क्षणभर व्यक्त ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१४/०४/२०२१)
(विरोध काव्य निर्माता)



Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?