तथध Read Count : 81

Category : Poems

Sub Category : N/A
अक्रोश इथेही असतो

डोळे पाणावत नसले
तरी अक्रोश इथेही असतो,
भावना असतात मनात
शब्दांचा आवाज मात्र नसतो ||

हेसुद्धा गप्पा मारत
एकमेकांना पाहून हसतात,
नसले ना अस्तित्व नात्यांचे
जोरजोरात ओरडून रडतात ||

यांच्याही जीवनात दरवर्षी 
जीवघेणा आजार येतो,
भरारी घ्यायची असते मित्रासोबत
पण तो यालाही दूर घेऊन जातो ||

मित्र सोबत असला
की यांनाही नसते दुःख,
पण एक दिवस हिरावतो
देवही यांचे सुख ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर
पुणे


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?