निखळ हास्य Read Count : 79

Category : Poems

Sub Category : N/A
निखळ हास्य

सांग तू हा छोटा जीव
सदा आनंदाने कसा हसतो,
जिथे आम्ही रोज जीवनात
क्षणोक्षणी फक्त रडतो ||

तुझे निखळ हास्य पाहण्या
चिमणीची भरारी पुरेशी असते,
तर गरूडझेप घेऊनही आमच्या
चेहऱ्यावर आनंदाची झालर नसते ||

तेजस्वी डोळ्यांत तुझ्या तुझा
निरागसपणा सापडतो,
तर आमचा खरेपणाही खोटेपणाच्या
चष्म्याखाली हरवतो ||

बाळा तुझ्या जीवनात कोणत्याही
जाती-धर्माचे वास्तव्य नसते,
जिथे आमच्याच विरोधात आमच्या हाती
रोज वेगळीच पताका असते ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१८/०४/२०२१)
पुणे




Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?