अज्ञान
Read Count : 108
Category : Poems
Sub Category : N/A
अज्ञान जीवनातील शापसारे जग घालतेय जागर शिक्षणाचामग तूच का राहतो निरक्षर,हो ना या पुस्तकांवर स्वारनि कर जगास साऱ्या साक्षर ||तू एकटाच जरी असला अशिक्षितहोतेच त्याने जगाची अधोगती,झोकून दे ना तू स्वतःस ज्ञानरसातअन् होऊ दे जगाची प्रगती ||या जगात नसतो कोणीचजन्मापासून असामान्य,तू झट ना त्यांच्यासाठी जेअजूनही म्हणतात स्वतःस सामान्य ||सांग तू ओरडून जगासशाप आहे जीवनासाठी अज्ञान,वाट तू मुठभर विचार तुझाअन् दे अवघ्या जगास या ज्ञान ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१६/०४/२०२१)( विरोध काव्य निर्माता )
Comments
- No Comments