Writing 064 Read Count : 134

Category : Poems

Sub Category : N/A
जिला शोधत होतो जीवनभर

रोजच गेला मिळत मला
या जगात क्षणोक्षणी अपमान,
कोण जाणे कधी मला मिळेल
या जगात मुठभर मान ||

संपलोय मी आज रे
झालाय जीव निराधार,
कोण जाणे कधी देईल 
मजला ओंडका आधार ||

कंटाळवाणे वाटते मला
हे रोजचेच जगणे,
सांगेल का मला कोणी
सोपे असते का ते मरणे ||

जिला शोधत होतो जीवनभर
ती वाट मला आज सापडली,
पण चालणार होती वाटेवर सोबत
तीच आज अचानक हरवली ||

वि रो धी का व्य
निर्माता : आदेश बाळू कोळेकर

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?