वाट माझी मला Read Count : 19

Category : Poems

Sub Category : N/A
वाट माझी मला

वाट माझी मला 
काट्यांतून चालायचीच आहे,
रोज एक एक पान वाचत
गोष्ट संपवायचीच आहे ||

नवे लिहिण्यास मला
लेखणी हातात घ्यायचीच आहे,
रोज एका नव्या तुफानाची
कैफियत मला मांडायचीच आहे ||

शाई मला रोज पेनात
रक्ताची भरायचीच आहे,
रोज मला नवीन कागदावर
कविता लिहायचीच आहे ||

रोज मला जगासोबत नवीन
कल्पना मांडायचीच आहे,
संघर्षमय गोष्ट रोज एका
ध्येयवेड्याची मला सांगायची आहे ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१५/०४/२०२१)
पुणे

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?