वाईट वाटतंय मला
Read Count : 137
Category : Poems
Sub Category : N/A
वाईट वाटतंय मलाआज तुला सोडून जावं लागतंय,चौदा वर्षांच्या सहवासानंतरक्षणोक्षणी तुलाच आठवावं वाटतयं ||कधी तू माझी प्रेमळप्रेरणादायी आई झालीस,रोज नवनवीन अनुभवतुझ्या लेकराला देत गेलीस ||तुझ्यात पहिले पाऊल टाकलेतेव्हा मोठमोठ्याने रडलो होतो,आज तुझ्यासोबतचे दिवस मोजततुझ्या मातीत घडलो होतो ||तो राष्ट्रगीताचा आवाज ऐकला नाहीकी रस्त्यावरही स्तब्ध होतो,फक्त पुस्तक नाही संस्कार तुझेआजही वाचत राहतो ||
Comments
- No Comments