मी कुठेतरी चुकतेय Read Count : 14

Category : Poems

Sub Category : N/A
मी आज कुठेतरी चुकतेय

आरशातच सौंदर्य पाहण्याची
आता सवय झालीय आम्हाला,
पाहण्यात सौंदर्य आरशाचे 
मनाचे अपंगत्व आलय तुम्हाला ||

स्वप्नातच महाराणीच्या रूपात
पाहते मी स्वतःला ,
बाकी काहीच जागा नाही
माझ्याच  मनात माझ्या मताला ||

जीवनात रोज रडताना मी
आरशात पाहून हसते,
स्वातंत्र्याचे गीत गात मी
व्यसनाच्या विळख्यात फसते ||

मिळालेत जरी अधिकार मला
मी आज कुठेतरी चुकतेय,
सोडण्यात विखळा भावनांचा
अचानक प्रेम नावाच्या मृगजळात बघतेय ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१४/०४/२०२१)
पुणे

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?