Writing 061 Read Count : 21

Category : Poems

Sub Category : N/A
तुझ्याच देशात आज भिवा

अफाट तुझे कर्तृत्व भिवा
कवितेत कसे बांधू ,
कार्याचे तुझ्या मंदिर फक्त
स्मारकाने कसे  सांधू ||

गेलात तुम्ही देऊन संविधान
एकतेचे नि बंधुत्वाचे,
पण आज तुझ्या नावाने घेतले
आम्ही झेंडे विभिन्न रंगाचे ||

दिलास तू अधिकार दलितांना
पण तेच आज जातीत गुंतलेत,
तुझ्या देशाचे नागरिक कितीत
व्सयनाच्या आहारी जाऊन संपलेत ||

तुझ्याच देशात आज भिवा
भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतंय,
स्वातंत्र्य दिलंय तुम्ही मिळवून पण
आज तेच जाती,धर्माच्या आगीत जळतंय ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१४/०४/२०२१)
पुणे


Comments

  • खूप छान कविता

    Apr 14, 2021

Log Out?

Are you sure you want to log out?