गुढी उभारूया Read Count : 16

Category : Poems

Sub Category : N/A
गुढी उभारूया

नव आकाश रोज 
पाहते स्वप्न नवे,
नववर्ष जपण्यास
संस्कृतीचे नाम मुखी हवे ||

जिद्द हवी मनी ती
मानवता जपण्याची,
चिकाटी हवी श्वासात
एक मुंगी होण्याची ||

नको बालपण मला
निरागसतेची साथ हवी,
समृद्धीसोबत पाहिजे
समाधानाची गुढी नवी ||

गुढी उभारूया आज
जीवनास नवी दिशा देणारी,
मातीसाठी रोज नव्याने
मरण कवटाळून घेणारी ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१३/०४/२०२१)
पुणे

 Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?