जळतो जीव माझा Read Count : 13

Category : Poems

Sub Category : N/A
जळतो जीव माझा

जळतो जीव माझा देवा
आज जीवन माझा जळतो,
तरीही का देवा मी का
या मृगजळामागे पळतो ||

राख होताना माझी 
आज मीच देवा पाहतो,
एकाच सरणावर मी
कित्येक माझ्यासोबत वाहतो ||

अट्टहास का माझा माझेच
रोज पाय ओढण्याचा,
हाच विचार करत मी देवा
माझ्यावरतीच रडतो ||

जरी जाणार मी देवा 
लाकडांतून अथवा धरतीतून या,
तरीही मी का वाटेत मझ्याच
स्वार्थापायी लाकूड रोवतो ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१२/०४/२०२१)
पुणे


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?