Writing 036
Read Count : 494
Category : Articles
Sub Category : Motivation
दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले मात्र कोरोनामुळे अनेकांना शालेय अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही.त्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत
कोरोनाच्या परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याला मानसिक त्रास सहन करावा लागला जास्तीत जास्त पॉझिटिव गोष्टी करण्याच्या प्रयत्न करणे जसे की जे थोर व्यक्ती असतात त्यांच्या स्टोरी वाचणे .सोबतच जास्तीत जास्त शांत राहून अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे
बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर पेपर होणार की नाही . मला सर्व इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगायचा आहे कि सर्वांनी अभ्यास करत राहावे कारण केलेला अभ्यास आणि मिळवलेले ज्ञान कधीही वाया जात नाही . मला असं वाटते की 90 % offline परीक्षा होणारच त्यामुळे तुमच्या सर्वांन जवळ वेळ कमी आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करावे. विविध विषयाचे पेपर सोडवून पहावे .त्याचप्रमाणे सोशल सायन्स चे विषय सोफी असतात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी Self Study कड़े लक्ष देणे गरजेचे आहे असे मला वाटते. गणित व सायन्स व इंग्लिश चे ऑनलाईन क्लास सुरू आहेत त्यामुळे प्रत्येक क्लास अटेंड करून ते विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा तसेच तुमच्या गावात किंवा शहरात ही विविध M.Sc /B.Sc झालेले विद्यार्थी असतात जर तुम्हाला अभ्यास करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही आपल्या Seniors ची मदत नक्की घेऊ शकता व त्याचप्रमाणे युट्युब वर सुद्धा विविध अभ्यासाची व्हिडिओ आहेत त्या video ची मदत तुम्ही घेऊ शकता शक्यतो सर्वांनी सोशल मीडिया म्हणजे व्हाट्सअप फेसबुक इत्यादी पासून दूर राहावे कारण जितके जास्त तुम्ही सोशल मीडियाचा वापर कराल तेवढे तुम्ही आळशी बनाल व अभ्यासाची आवड कमी कमी होत जाईल व अभ्यास करायला तुम्हाला त्रास होईल एक गोष्ट लक्षात
ठेवा अभ्यासाशिवाय पर्याय नाही व तुम्हाला अभ्यास करून तुमच्या मध्ये Skill आणावेच लागेल
कारण तुमचा असलेला अभ्यास आणि तुमच्या मध्ये असलेली स्किल हेच उद्याचा तुमचं भविष्य डिसाईड करत असते तुमचा अभ्यास आणि तुमच्या मध्ये असलेल्या स्किल हेच तुम्हाला चांगले कॉलेज मिळवून देईल ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या
कारण नवीन शैक्षणिक धोरण पूर्णपणे स्किल वर आधारलेले आहेत ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी
रोज मेडिटेशन व सोबतच व्यायम सुद्धा करत चला तुम्ही फिट असाल तरच तुमचा अभ्यासात मन लागेल ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा
सर्वांनी अभ्यास करत राहा व स्वतःची काळजी घ्या
सागर जाधव
7038204209
वणी,यवतमाळ
<!--/data/user/0/com.samsung.android.app.notes/files/clipdata/clipdata_210304_214431_088.sdoc-->