
ही वाट
Read Count : 152
Category : Poems
Sub Category : N/A
ही वाट जाते कुठे ?ही वाट हिरवळीतून धावणारीहाका मारत ओरडून बोलावणारी,आज शांतपणे लपून नकळतमनाला अंधारात ठेवून जाते कुठे ?ही वाट प्रेमदरी ओलांडून जाणारीतिला मला रोज ठरवून भेटणारी,प्रेमळ गप्पांचा माझ्या आस्वाद घेणारीआज विरहानंतर रागावून जाते कुठे ?ही वाट माझ्या नव्या स्वप्नांचीरोज नवीन पाठ जीवनाचा शिकविणारी,इथेच अचानक माझी परीक्षा घेणारीआज जिंकल्यावर मध्येच थांबून राहते कुठे ?ही वाट रागावलेल्या आईतून प्रेमळ तिला हाक मारणारीनकळत माझी बाजू घेऊन मत मांडणारी,तर कधी प्रसंगी स्वतःच आईचे रूप घेणारीही माझी हक्काची वाट सोडून जाते कुठे ?:~ आदेश कोळेकर (०१/०३/२०२१)वेळ:(. )
Comments
- No Comments

