😥👩‍🔬👍👩‍🔬👍👍😍😥👩 Read Count : 22

Category : Poems

Sub Category : N/A
👩‍🔬विज्ञानाची साथ हवी आहे 👩‍🔬

घडविण्यास हा देश माझा
विज्ञानाची साथ हवी आहे,
अणु रेणूंना जोडणारी 
चिकाटी हवी आहे ||

चालताना वाट जोडीला
आरशातील प्रतिमा हवी आहे,
तर कधी जीवनसत्त्व घेतल्या
उन्हाची कोवळी वात हवी आहे ||

देशाच्या माझ्या सुरक्षेसाठी
क्षेपणास्त्रांची ढाल हवी आहे,
कधी चेंडू हातात झेलण्या
न्यूटनची नजर हवी आहे ||

बळीराजाच्या मदतीसाठी
संकरित बियांची जोड हवी आहे,
तर कधी गणित सोडविण्या
रमणजींची पद्धती हवी आहे ||
:~ आदेश कोळेकर (२८/०२/२०२१)
वेळ:०४:५२


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?