होळी Read Count : 110

Category : Poems

Sub Category : N/A
होळी 

चला होऊया एक आपण
आज रंगांत मिसळून जाऊया,
सोडून जातपात आपण
जगात एकीचा रंग लावूया ||

आज तुम्ही मी एक होऊन
धर्मभेदाची होळी जाळूया,
आळस,राग, अहंकाराच्या 
नावाने बोंब मारूया ||

आज त्याच्याएवढाच सणाला
तिला आपण सन्मान देऊया,
नको हा सण आनंदाचा माझ्यापुरताच
तो कणकण साऱ्या जगात वाटूया ||

पर्यावरणपूरक होळी साजरी करून
आदर्श नवा मानवजातीत ठेवूया,
या हातात हात घेऊन सारे
संस्कृती प्रत्येक हृदयात जपूया ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर(२८/०३/२०२१)
वेळ:१०:३७


Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?