साथी Read Count : 15

Category : Poems

Sub Category : N/A
🚲🚲माझी साथी 🚲🚲

🚲चालणे तुझ्यासोबत का🚲
🚲आज साऱ्या जगास खुपते ?🚲
🚲पाहून आज एक दृढ नाते🚲
🚲जग का त्यांच्यावर जळते ?🚲

🚲जीवनाची साथी तू माझी🚲
🚲आज गाड्यांना का घाबरते ?🚲
🚲माझी पर्यावरणपूरक साथी🚲
🚲आज हळूहळू मागे का पडते ?🚲

🚲आज धावणारे पाय तुझे🚲
🚲कुबड्यांत अडकून का पडतात ?🚲
🚲आज चांगली वाईट नावे तुझी🚲
🚲तुझ्या किमतीवरून का पडतात ?🚲

🚲काल,आज आणि उद्याही माझी🚲
🚲तुच सोबती असशील का सखे ?🚲
🚲या धावत्या जगाच्या प्रवासात🚲
🚲तु मला साथ देशील का सखे ?🚲

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२७/०३/२०२१)
वेळ:०९:३२ 

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?