रंगलो मी रंगात Read Count : 17

Category : Poems

Sub Category : N/A
🎺🎻रंगभूमी 🎵🎶

🎷रंगलो मी रंगात🎷
💃ठाकले पाय भूवरी,💃
🕺नृत्याविष्कारास मी🕺
🎤उतरलो रंगभूमीवरी ||🎤

🎷हसवले मी आज जगास🎷
💃बोलून रंगमंचावरी,💃
🕺लपवून ठेवले अश्रू माझे🕺
🎤ठेऊन झाकण मनावरी ||🎤

🎷मंत्रमुग्ध केले हृदयास मी🎷
💃गावून गीत मनाचे कंठातूनी ,💃
🕺रडवले माणसाला मी🕺
🎤तोडून जात धर्मातूनी ||🎤

🎷बांधून घुंगरू पायात🎷
💃नाचले नादात ढोलकीतूनी ,💃
🕺आज शिकवले मी शिवबा🕺
🎤माझ्या पोवाड्यांतूनी ||🎤
✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२७/०३/२०२१)
वेळ:१२:१५

जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

Comments

  • very nice

    Mar 27, 2021

Log Out?

Are you sure you want to log out?