वेडे मन‌‌ माझे Read Count : 22

Category : Poems

Sub Category : N/A
❤️🙂वेडे मन माझे🙂❤️

वेडे मन माझे
गुंतले नात्यांत या
गुंता सोडू कसा ?
रंग हे दाटले मनी त्यांना
🌹उधळू जीवनात या ||🌹
कधी एक नाते मनाचे
हृदयस्थ झाले स्वप्नांत या
त्यात मी अडकेल का ?
चल वाट दाखविणारे नाते
🌹माझ्या सुरांत गावूया ||🌹
पैंजण ओढावते मना
मधुर गीत सुरेल गाऊनी
पण पाय साथ देतील का ?
चल धरू फेर सोबतीने
🌹पायांत बळ स्वप्नांच्या आणुनी ||🌹
जोडल्यात आज मनाने
हजारो प्रेमाच्या लहरी या
पण त्या वास्तवात आहेत का ?
बांधल्यात या लहरी हातात
चल सखे हे प्रेमळ जीवनगाणे 
🌹तुझ्या परी विश्वाच्या मैफिलीत गावूया ||🌹
✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२६ मार्च २०२१)
वेळ:०६:४४
Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?