Writing 062 Read Count : 16

Category : Poems

Sub Category : N/A
मी

आज मी पुस्तकात माझ्या
उद्याचा देश वाचत होतो,
बेड्यांत अडकलेल्या आईला
जुलमी जगातून सोडवू पाहत होतो ||

जन्मल्यावर स्वप्न मी
मातीसाठी लढण्याचे पाहत होतो,
धमण्यांत माझ्या फक्त मी
'इन्कलाब झिंदाबाद'च भिनवत होतो ||

आज अंधारकोठडीतही मी
उजेडाचीच वाट पाहत होतो,
फासावरही जाताना मी
मुक्ततेची मशालच पाहत होतो ||

आज जरी लाललो होतो मी
माझा तिरंगाच फडकवत होतो,
प्रत्येक रक्ताचा थेंब मी
माझ्या मातीसाठीच सांडत होतो ||
✍️ आदेश बाळू कोळेकर (२३/०३/२०२१)
वेळ:०९:००

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?