🐥🐥🐥🐥🐥 Read Count : 22

Category : Poems

Sub Category : N/A
😈जात😈

झेंडे घेऊन जातींचे जन्मभर
मी आज संपलो होतो,
जातीच्या भितीने मी आज
सरणावर झोपलो होतो ||

आज ती जातच मला
खांदा द्यायला आली होती,
शेवट करेन मीच तुझा
असं ओरडून सांगत होती ||

जळताना पाहून जात मला
मोठमोठ्याने हसत होती,
आज आगीतही मीच आहे
असं म्हणून घाबरवत होती ||

आता पाहून माझी झालेली राख
जात विजय साजरा करत होती,
येतेय दुसऱ्याला घेऊन पुन्हा
असं आत्मविश्वासाने सांगत होती ||
✍️✍️ आदेश कोळेकर (२२/०३/२०२१)
वेळ:०५:४३

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?