
Writing 039
Read Count : 127
Category : Poems
Sub Category : N/A
आनंद शोधण्यास वेळ कुठे ?आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडेपण शोधण्यास आम्हाला तो वेळतरी कुठे ?धावण्यात या डबक्यातील शर्यतीमध्येआम्हाला आनंदाचा बहर पाहण्यास वेळ कुठे ?दु:खाचे रडगाणे गाण्यात जीवनभरआम्हाला इतरांना आनंद देण्यास तरी वेळ कुठे ?मुखवट्यांत या खरा चेहरा लपवलेल्याआम्हाला खरे हसू तरी शोधण्यास वेळ कुठे ?काचेतल्या खोट्या मनोरंजनात रमणाऱ्याआम्हाला खऱ्या आनंदाची व्याख्या वाचण्यास वेळ कुठे ?तंत्रज्ञानाच्या मागे पळण्यात सततच्याआम्हाला माझ्या मनाचा आनंद शोधण्यास वेळ कुठे ?✍️✍️ आदेश कोळेकर (२०/०३/२०२१)वेळ:०७:२८
Comments
- No Comments