ये मेघराजा Read Count : 103

Category : Poems

Sub Category : N/A
|| ये मेघराजा ||

कंप फुटला धरणीमाईला
हृदयास गेला तडा,
चल रे मेघराजा ये लवकर तू
भरण्या कष्टाचा घडा ||

वाट तुझी पाहणारे डोळे
भास्कराच्या तलवारीने घायाळ झाले,
ये घाव भरण्या धरणीमातेचे
तुझी माया पाहण्या अश्रूही सरसावले ||

गळ्यात आला फास त्याच्या
ओवी सुटली नि मन गाऊ लागले मरणगाणी,
अडविण्या त्यास,बळ देण्या हातांना
ऐकू दे रे मेघराजा तुझी तृप्तवाणी ||

राजा-सर्जाही हंबरू लागलेत
मेघराजा तुझ्या येण्याच्या आशेने,
ये लवकर तू पुजू दे तुला
माझ्या पेरणीच्या ओवीने ||
:~ आदेश कोळेकर (१२/०३/२०२१)
वेळ:०६:०६

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?