👩‍🏫🇮🇳👩‍🏫👩‍💼🙂👩 Read Count : 47

Category : Poems

Sub Category : N/A
👮वर्दीतील देवमाणूस👮

तो उत्तुंग स्वप्नांच्या जोरावर
देशकार्यास भरारी घेतोय,
प्रत्त्येक मानवाच्या संकटात
श्रीकृष्ण होऊन येतोय ||

तो कधी एक दिवस
संकटात मित्र होऊन येतोय,
तर कधी तो प्रसंगी
शिवबाचा एक मावळा होतोय ||

तो अहोरात्र आपल्या रक्षणासाठी
 ढाल होऊन उभा राहतोय,
तर कधी तो मातीसाठी
छातीवर गोळ्या झेलतोय ||
  
तो कधी घर-कुटुंब सोडून
साऱ्या समाजाचा संसार राखतोय,
तर कधी भाऊ होऊन
आई बहिणींचे रक्षण करतोय ||
:~ आदेश कोळेकर (२०/०२/२०२१)
वेळ:०९:२३






Comments

  • very nice poem

    Feb 20, 2021

Log Out?

Are you sure you want to log out?