,,,,,,,,,, Read Count : 57

Category : Poems

Sub Category : N/A
! आशिर्वाद विकत घेतला !

आज मी गेलो मंदिरात
चालत बोलत मनाशी,
होता तिथे दगडांचा देव
जोडणारा हात स्वार्थी मनाशी ||

वाहिली तिथे मी फुले
नि नारळ दोन चार रुपयांची,
टाकली दानपेटीच्या घशात
चुरगाळून नोट दहा रुपयांची ||

तिथे काही वेळ बसून मी
होम हवनही केला,
नि तुपाने भरलेला पेला
आगीत ओतून दिला ||

मी आज कष्टाचा पैसा
आगीत जाळून टाकला,
नि सकाळी सकाळीच आज
आशिर्वाद विकत घेतला ||
:~ आदेश कोळेकर (०८/०२/२०२१)
वेळ:०९:१६

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?