.....; Read Count : 113

Category : Poems

Sub Category : N/A
! चाललोय !

चाललोय आज मी प्रवासाला 
विश्र्वातील माणुसकीच्या शोधात,
उभा राहिलोय जीवनाच्या थांब्यावर
जाण्यासाठी बंधुभावाच्या गावात ||

घेतलयं मी गाठोडं खांद्यावर
पुरोगामी विचारांचे माझ्या,
संपवायला निघालोय मी
अंधश्रद्धेचा गाजावाजा ||

आलोय मी आज चालत चालत
जत्रेत जगाच्या साऱ्या,
थांबविण्यास धावतोय मी
जाती धर्माच्या वाऱ्या ||

येईल मला अडवायला वाटेत
जाती धर्म कर्मठांचा वारा,
पण माणूस होण्यास एक व्हा
हाच माझा साऱ्या जगास नारा ||
:~ आदेश कोळेकर (०४/०२/२०२१)
वेळ:०९:१४
 

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?