..... Read Count : 68

Category : Poems

Sub Category : N/A
! एवढेतर आपण करायलाच हवे !

नाहीत डोळे त्यांना,त्यांना दृष्टीही नाही
तरीही ते जीवनात सप्तरंग शोधत आहेत ना,
त्यांच्यासाठी एक दिवस आपण आंधळे व्हायला हवे
आपली संपत्तीची उंची सोडून मातीला पाहायला हवे ||

जगात आहे मधुर-कर्कशही आवाज सारा
पण तो तुला ऐकूच येत नाही ना,
मग एक तास आम्हीही बहिरे व्हायला हवे
चेहऱ्यावरील हावभावावरून माणसाला जाणायला हवे ||

कुंचल्याने रंगले आहे आज विश्व सारे
पण तुझे हात रेखाटण्या साथ देत नाहीत ना,
मग आम्हीही एक दिवस हातांना विसरायला हवे
शब्दांतून माझ्या मनाला रंगावया हवे ||

तुला उद्या या देशासाठी खेळायचे होते
पण तुझे पाय तुला सोडून गेलेत ना ,
मग मी आज क्षणभरतरी अपंग व्हायला हवे
नि तुझ्या प्रवासात मिनिटभर पुढे चालायला हवे ||
:~ आदेश कोळेकर (०३/०२/२०२१)
वेळ:०८:५६

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?