Writing 030 Read Count : 10

Category : Poems

Sub Category : N/A
शाळेत मला घेतलं कानाला हात पुरतो का पाहून,
शाळेत मला बोलावलं मग मीही पाहिलं जाऊन. पहिलाच दिवस होता कळलं नाही काही,
 बाई शिकवत होत्या मला,
 पण सार डोक्यावरून जाई .
मग सुरु केलं त्यांनी फळा पांढरा करायला ,
मी पण प्रयत्न केला त्यापुढे गिरवायला .
छान छान कविता होत्या ,
मज्जा यायची म्हणायला.
 हळूहळू शिकत होत्या
 बाई इंग्रजी बोलायला.
 इंग्रजीची अक्षर अगदी ,
इंग्रजांसारखी कठीण दिसत होती .
पाण्यात पोहणार्‍या माशासारखी ,
बाईंची अक्षर फळ्यावर पोहत होती .
आता थोडं थोडं बाईंनी गणित चालू केलं,
मी खूप प्रयत्न केला पण,
 गणित मला
कधीच नाही आलं.
 इतिहास हळूहळू शिकवायला सुरु केला ,
लक्ष देऊन सुद्धा शेवटी ,
मेंदूतला इतिहास पळूनच गेला.
विज्ञानाला चालना दिली,
शिक्षक विज्ञान शिकवत होते,
 मी जरा मागे फिरून पाहिलं
 तर लेकरं डुलक्या खात होते.
 हळूहळू बीजगणित आणि भूमिती ,
डोक्यात शिरत होती .
कितीही किंमत काढली तरी,
 शेवटी शून्यच उरत होती.
व्याकरण शिकवताना मेंदू ,
वाक्यांनीच गच्च भरायचा ,
खूप व्याकरण शिकून झाल्यावर.
भूतकाळ आणि भविष्याचाच अर्थ कळायचा.
शेवटी कशीबशी मजेत,
 दहावी मागे निघून गेली.
 साधे साधे विषय  मागे राहिले,
 फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आली.
 आता पुढे गंभीर परिस्थिती तरी,
 केमिस्ट्रीच्या रिॲक्शन  मात्र ,
डोक्यात कधी गेल्याच नाही.
 साधी सरळ आणि सोपी ,
आयुष्याची सुरुवात सुरू झाली.
 कधी अभ्यास करून कधी अभ्यास मागे टाकून, बारावी निघून गेली.
 पुढच्या शिक्षणाची तरी ही मनात आस होती,
कसे शिकवणार आईबाप पुढे ?
बारावी बळच पास होती .
शेवटी नोकरी लागली आणि,
 अग्निशमन दल पाहिले.
 नवीन नवीन बरं वाटलं ,
नंतर मात्र प्रत्येकाच्या नजरेंचे कल दिसून राहिले. खूप त्रास सहन केला,
 आयुष्य जगण्याच्या नादात .
लोकं डाव साधून घेतात ,
बुद्धी आणि विचारांच्या वादात .
असंच काही घडलं या आयुष्याच्या दलामध्ये,
विष ओतलं जातं  चांगल्या विचारांच्या बलामध्ये. अजून तरी असच आहे ,
पुढे काय असेल माहित नाही?
 चला अनुभव घेऊ आता,
 पुढे बदलतेय का काही.


                        कवी :-सिमा निवृत्ती ससाने
                            मुंबई अग्निशमन दल
                          विक्रोळी अग्निशमन केंद्र
         

Comments

  • Jul 27, 2020

Log Out?

Are you sure you want to log out?