मरण आलं होतं Read Count : 93

Category : Poems

Sub Category : N/A
आईच्या दूधावर आणि 
बापाच्या कष्टावर मोठा झालो.
का कुणास ठाऊक न राहवून मी,
एका मुलीच्या प्रेमात पडलो. 
यामुळेच का माझं आयुष्य ,
सुख-दुुःखाने बहरून गेलं होतं,
की तिच्याच हातून माझं ,
मरण आलं होतं. 
आईपासून दूूूर झालो,
बाबांनाही विसरून गेलो. 
मागचा पुढचा विचार नाही, 
तिच्या नादात मृत्यूला 
जवळ आणत गेलो.
कधी कसं कळलंच नाही ,
कसा तिच्यात बुुडत गेलो ?
यामुळेच का माझं आयुष्य, 
सुख-दु:खाने बहरून गेलं होतं,.
की तिच्याच हातूून माझं, 
मरण आलं होतं. 
गेली सोडून ती मला आज,
आता आभाळ फाटून गेलंं. 
तरीही माझ्या आईनेे,
कुरवाळून जवळ घेेतलं.
कळत नाही, हे बळ....
आई-बापातच कुठून आलं?
त्यांची कदर न करता, 
तिच्या मागे धावत गेलो,
असं वाटलं जणू, 
मी जीवंत असून मसनात गेेेेलो.
सोडला शेवटचा.....
 श्वास आईच्या मांडीवर,
पाहीले मी मरता-मरता ,
दुखःश्रू तिच्या गालांवर .
यामुळेच का आयुष्य माझं,
 सुख-दुुखःने बहरून गेलं होतं .
की तिच्याच हातून माझं मरण आलं होतं. 


                           ( कवी :-सिमा निवृत्ती ससाने )
                                मुंबई अग्निशमन दल 
                             विक्रोळी अग्निशमन केंद्र

Comments

  • Omprakash Singh

    Omprakash Singh

    वस्तुस्थिति

    Jul 24, 2020

Log Out?

Are you sure you want to log out?