
स्त्री हक्क
Read Count : 133
Category : Poems
Sub Category : N/A
तुम्ही पेटलेला दिवा असाल तर,
मिणमिणती वात आम्हाला व्हायंचय.
तुमच्या आपेक्षेेेला असणारी,
नशीबाची साथ आम्हाला व्हायचय.
रूजलेल्या बिया बनूनी,
पुन्हा नव्याने उगवायचय.
साहेब !... आम्हालाही,
आता हक्काने जगायचंय.
संविधानाने दिली आहे,
जगण्याची आस आम्हाला.
देऊन दाखवू देशासाठी,
आम्ही प्राण तुम्हाला.
तुम्हीच आता समजून घ्या,
ज्या दृश्याकडे हक्क आहे,
ते दृश्य आम्हाला बघायचय.
साहेब!...आम्हालाही,
आता हक्काने जगायचंय.
माझा गुन्हा,माझा दोष,
कधीच कुणी सांगितला नाही.
तुमच्या विचारांच्या कुंपणाापुढे,
स्त्री कधी कळलीच नाही.
आम्हाला आमचा हक्क हवा,
हे आम्हीच का सांगायचं?
साहेब!....आम्हालाही ,
आता हक्काने जगायचंय.
नका समजू आम्हाला,
आम्ही तुमच्या वर भार आहेत.
डाॅ. आनंदीबाई जोशी,सावित्रीबाई फुले,
कुठे किरण बेदी तर कुठे कल्पना चावला,
यांंचा विचार करून लोकं बेजार आहेत.
समजावून सांंगा तुमच्या मनाला,
आम्हालाही असच काही बनायचय.
मिळावा सन्मान ! हा हक्क आहे माझा,
मलाही जग अनुभवायचंय,
साहेब !....आम्हालाही
आता हक्काने जगायचंय .
(सिमा निवॄत्ती ससााने)
मुंबई अग्निशमन दल
विक्रोळी अग्निशमन केंद्र
Comments
- No Comments