🙏मुलीचा बाप 🙏 Read Count : 58

Category : Poems

Sub Category : N/A
पहिल्यांदाच त्याला मुलगी झाली, 
पहिली बेेटी,धनाची पेटी समजून, 
त्याने  ह्रदयाशी धरली.
खूप लाडाने आणि प्रेमाने, 
मोठी होऊ लागली.
काल बापाची करंगळी,
धरून चालणारी पोर ,
कधी बापाच्या खांद्याला लागली 
कधी  कळलच नाही.
आता तिच्या लग्नाच हुरहुर आणि, 
तिच्या पुुढच्या आयुष्याची फिकीर होऊ लागली. 
बापाने डोळ्यात घालून जपलेली पोर, 
हळूहळू दूर जाऊ लागली .
मग पुढे आली लग्नाची गोष्ट.
या गोष्टीवर बापाने केलं, 
तिच्याशी बोलणं स्पष्ट. 
आले पाहूणे पाहून गेेेले,
मुुुुलगी पास झाली.
पोरीची बाजू समजून पाहूण्यांनी ,
हुुंंड्याची मागणी केली. 
रात्री एकटाच बसून लग्नाचा खर्च काढत होता,
मुुुुलीच्या सुखासाठी हुंडा मान्य केला ,
एका बापाची....
  मुलीचा बाप असल्याची चूूूक,
लग्नाचा खर्च लाखोवर गेेला.
लग्न जवळ
 आलं,
बापाचे डोळे मुलीला पाहून पान्हावू लागले .
कधी मांडीवर बसून हट्ट करणारी,
 पोरगी दूर गेली...
या विचाराने दोन्ही डोळे वाहू लागले. 
शेेवटी लग्न झालं ......
लग्नात लोकं जेऊन गेली, 
सोयरे हवा तेवढा हुंडा घेऊन गेली. 
जेेवणारे  लोकं पोटभर जेवले.
खाऊन पिऊन शेवटी नावं ठेऊन गेले.
एवढं सगळं करून देखील, 
मुुलीचा बाप रडत म्हणाला, 
लाडाची लेक आहे माझी, 
काही चुुकलं असेल तर माफ करा. 
बाप उंबरठ्यात ऊभा राहून, 
मुुुलीला नजरेआड होताना, 
डोळ्यानेे बघत होता. 
एवढे लाड केले की,
तिचे लहानपण आठवून, 
ढसा- ढसा रडत होता. 
शेेवटी बायकोनेेच आवरलं,
मोठा श्वास सोडत बोलली.....
पोरी शेवटी परक्याचच धन !
पोरगी जन्माला घालायची ,
लहानाची मोठी करायची .
आणि शेवटी....
आपणच मारायचं मन.

                         ( कवी:- सिमा निवृत्ती ससाने )
                                 मुंबई अग्निशमन दल 
                         🚒विक्रोळी अग्निशमन केंद्र🚒

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?