
आनंद शहरात मिळेना
Read Count : 143
Category : Poems
Sub Category : N/A
सूर्य ढगाआड गेला,
सारीकडे काळोख झाला.
शहरातल्या स्लॅपच्या फ्लॅटमधूून ,
वातावरणाचा अंंदाज काही कळेना.
माझ्या गावच्या पत्र्यांच्या घरांचा,
आनंद शहरात मिळेना.
पत्र्यांवर पडला पाऊस,
टप-टप आवाज यायचा.
पाऊस आता खूप येेेणार,
ढगांकडे पाहून अंदाज कळायचा.
इथे मात्र गॅलरीत ऊभ राहून,
पावसाच्या धारांंना बघावं लागतं .
बाहेर पावसाचा आनंद न घेता,
घरात दडूूून रहावं लागतं.
थंडी वाजून आली तरी,
गरम - गरम गोधडी काही मिळेना.
माझ्या गावच्या पत्र्यांच्या घरांचा,
आनंद शहरात मिळेना.
गावी दारात पावसाचा पूर यायचा,
दारात पाण्याचा डोह साचायचा.
डबक्याने त्याला बाहेर काढायचा.
पाणी बाहेर काढायच्या कारणाने,
पावसात भिजण्याचा आनंद मिळायचा.
शहरातली लोकं बाथरूममध्ये ,
पाऊस बांंधतात.
आणि निसर्ग निर्मित पावसाला,
दूरून पाहत राहतात.
गावाकडे मस्त मजेत जगतात लोकं,
शहरातलं संकट काही टळेना.
माझ्या गावच्या पत्र्यांच्या घरांचा,
आनंद शहरात मिळेना.
(कवी:-सिमा निवॄत्ती ससााने)
मुंबई अग्निशमन दल
विक्रोळी अग्निशमन केंद्र
Comments
- No Comments