
☠कोरोना मृत्यूची %2
Read Count : 104
Category : Poems
Sub Category : N/A
सजवत नाहीत मला आता,
मी शांत झोपून राहतो.
पाहतात मला झोपलेला,
पण जो तो पाहून निघून जातो.
शेवटची अंघोळ कसली?
थंड पाणीही फेकत नाहीत माझ्यावर.
मला स्मशानात घेऊन जाण्यासाठी,
रागवतात एकमेकांवर.
ज्यांच्या खांद्यावर बालपण गेलंं,
तेच दूूूरून पाहत राहीले आणि बोलले,
बरं झालं हे मेलं.
जवळचे सारेच होते,
आज झाले सारे परकेे.
याला कोण उचलणार?
असं म्हणत होते सारखे.
स्मशानात गेलो तरी,
कुणी तोंड माझं पाहीलं नाही.
या कोरोना रोगामुळे,
आपलं परकं कोणी राहीलं नाही.
मला वाटलं,
अजून चार दिवस जगावे,
म्हणजे तेवढ्यात भागेल .
माझ्याच रक्ताच्याा माणसांनी विचारलं,
अजून किती वेळ लागेल?
सरणार शेवटचं झोपणही,
मला मिळंंलं नाही.
या कोरोना रोगामुळे ,
माझ्याच घरच्यांनी मला जाळलं नाही.
(कवी:सिमा निवृृत्ती ससाने )
मुंबई अग्निशमन दल
विक्रोळी अग्निशमन केंद्र
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
Comments
- No Comments